Thursday 27 June 2024

कुणी म्हणे राम कृष्ण, कुणी विठ्ठल तो म्हणे
म्हणे कोणी शिवशंभो, कुणी निर्विकार जाणे

कुणी करी तीर्थयात्रा, कुणी पाळी देवधर्म
ध्यानी ध्याती काही जण, कुणी जाणी त्याचे वर्म

तत्त्व जाणे कुणी एक, सांगे हिंडुनीया जनी
लोक शोधती बाहेर, देव पाही मधातूनी

करा मनाचा आरसा, गंगे सारखा निर्मळ
याचिदेही याची डोळा, कृष्ण दिसेल खट्याळ

मन भरून तो पाही, सर्व व्यापून तो जाई
रोमी रोमी उतरुन, त्यासी एकरूप होई