Friday, 9 May 2014

ऊन्हातही सरी

भावना माझी असेल इतकी खरी
म्हणुन बरसल्या ऊन्हातही सरी

तिच्या आठवांच्या सहारे

कळेना कसेहे कुनाला मनावे
मनीचे गह्राणे पियेने सुनावे

समोरी बसावे नित्य जेवताना
तसे तू पहावे असे मी पहावे

अव्यक्तात ही प्रेम आहे कळाया
अव्यक्तातले गूज जानून घ्यावे

तिच्या जाणिवेच्या सुगंधा भुलावे
कटाक्षात हास्यात आता झुलावे

जरी भेट या.. जन्मा न झाली
तिच्या आठवांच्या सहारे जगावे

Monday, 16 September 2013

वेगळा

राहिलो तुम्हात पण राहिलो मी आगळा
स्वप्न हे गुंफीत जातो छंद माझा वेगळा

कार्य हे अर्पित असतो दूर देशीच्या स्थळा
अंतरी शोधीत असतो छत्रपतींचा मावळा

उत्तरे शोधीत असतो, मार्ग क्रमितो स्वबळा
अंतरी विनवीत असतो गोकुळीचा सावळा

विनोदी बोल बोलतो  हासवाया वर्तुळा
ज्याची त्याला असती मग अंतरीच्या या कळा

वर्ण हे सोडीत जातो भेदीत जातो या मळा
ओलांडतो सीमा श्वास घ्याया मोकळा