Saturday 3 February 2018

तुजविण

तुजविन सखे ग सांगु
काय मनाला या मी

मनं रमत हे नाही
न वाटे करावे काही

शब्द सोबती येथे
पण स्पर्श तुझा नाही

बोलता येते सगळे
पण व्यक्त होत नाही

कसे सांगावे तुजला
भावनांचे गुज हे

धड समजत नाही
सांगताही येत नाही

पळतोय मागे मागेे
आयुष्याच्या या मी

धरता येत नाही
सोडता पण येत नाही

जणु जगण्यासाठी आहे
मानव जन्म आपला

हसता येत नाही
हसवीता पण येत नाही

सांग कसे मी राहु
तुझवीन आरण्यात येथे

धड राहवत ही नाही
निघता पण येत नाही

असंच तूझ्या आठवणीत ............