( विडंबन काव्य. )
गच्च व्हायली कमरला पॅन्ट
हुकं तुटाया लागलं ॥
दोन पोळ्या कमी कर
शर्ट फाटाया लागलं॥
साऱ्या गावातं काल बोभाटा झाला
खाली बसताना टावेल फाटून गळाला
श्वास ओढुन आखडुन घे
ढेरग लोंबायला लागलं
दोन पोळ्या कमी कर
पॅन्ट फाटाया लागलं॥
दोन पोळ्या कमी कर
शर्ट फाटाया लागलं॥ १ ॥
पोट हलतं गदगदा
म्हणून हसत नाही
फोटो काढताना पोट
मध्ये ओढून घेई
पोट हलतं गदगदा
म्हणून हसत नाही
फोटो काढताना पोट
मध्ये ओढून घेई
शर्ट खालून काय तुझं
बाहेर यायला लागलं
शर्ट खालून काय तुझं
बाहेर यायला लागलं
दोन पोळ्या कमी कर
पॅन्ट फाटाया लागलं॥
दोन पोळ्या कमी कर
शर्ट फाटाया लागलं॥ २ ॥
पॅन्ट काढताना तुझी निघणं झाली मांडी
अरं गर्दी झाल्यावर व्हायली भांडा भांडी
तुझ्या ओढा ओढीने माणुस पडाया लागलं
दोन पोळ्या कमी कर
पॅन्ट फाटाया लागलं॥
दोन पोळ्या कमी कर
शर्ट फाटाया लागलं॥ ३ ॥
No comments:
Post a Comment